राहुल गांधी गाझावर बोलतात पण बांगलादेशविरोधात मूग गिळून गप्प बसतात! भाजप नेत्याने राहुल गांधींना फटकारले

09 Aug 2024 20:00:37

 

Rahul Gandhi...
  
 
नवी दिल्ली (Rahul Gandhi) : बांगलादेशात काही दिवसांपासून हिंदूंवर हल्ला होत आहे. हिंदूंची घरे उद्ध्वस्त केली जात आहेत. मंदिरांचीही तोडफोड केली जात आहे. याप्रकरणावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी मूग गिळून गप्प आहेत. राहुल गांधी गझावर अनेकदा बोलले आहेत. मात्र,बांगलादेशविरोधात बोलताना मूग गिळून गप्प का आहेत? असा तिखट सवाल भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी ९ ऑगस्ट रोजी केला आहे.

 

विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेबाबत बोलत नाहीत. जेव्हा बांगलादेशात नवीन सरकार स्थापन झाले. त्यावेळी राहुल गांधींनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशात सरकार स्थापन केल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बांगलादेशातील सुरू असलेल्या हिंसाचारावरही त्यांनी भाष्य केले. मात्र राहुल गांधींनी शुभेच्छा दिल्या आणि बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारावर एकही अक्षर काढले नाही.

 

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युनूस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर शुभेच्छा दिल्या. तसेच नरेंद्र मोदींनी शांतता आणि बांगलादेशात असलेले अल्पसंख्यांकांचे व्यवस्थापन व्हावे, असे सरकारला सांगितले. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांसाठी एकत्र काम करू असे मोदी म्हणाले होते. तसेच राहुल गांधी यांनी भाष्य केलेय  

दरम्यान, प्राध्यापक मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतल्याबद्दल राहुल गांधींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मात्र बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसावर भाष्य केले नाही, असा दावा अनुराग ठाकूर यांनी केला आहे.

 
Powered By Sangraha 9.0