सांस्कृतिक मूल्यांसाठी पाकिस्तानपासून वेगळा झालेला बांगलादेश. आज पाकिस्तान खूश असेल की त्यांची ती भिकारी आणि लुटारू वृत्ती बांगलादेशच्या कौमच्या लोकांनी जपली आहे. कुणी हातात महिलांचे अंतर्वस्त्र घेऊन फडकवतोय, तर कुणी ब्लाऊज हातात घेऊन नाचवतोय. ते अंतर्वस्त्र, तो ब्लाऊज कुणाचा तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा. विकृत कृत्य करणारे व शेख हसीना एकाच कौमच्या! जिथे स्वत:च्या कौमच्या ज्येष्ठ महिलेबाबत असे घृणित कृत्य झाले, तिथे काफिरच समजले जाणार्या हिंदूंची काय कथा आणि व्यथा!
आज बांगलादेशमध्ये केवळ आठ टक्के असलेल्या हिंदूंसोबत काय होत असेल, हा विचार केला तर भयंकर अस्वस्थता निर्माण होते. हिंदू आहे म्हणूनच त्या स्त्रीवर अत्याचार करणे, हेच आपले प्रथम कर्तव्य अशा कैफात तिथली ती विकृत झुंड वावरत आहे. सामुदायिक अत्याचार, बलात्कार, खून यांचा हैदोस सुरू आहे. कसायाच्या तावडीत सापडलेल्या गायीची जी अवस्था आहे, तीच अवस्था बांगलादेशातील हिंदू आयाबहिणींची आहे. ‘ऑल आईज ऑन राफा’ म्हणणार्यांना बांगलादेशातील हिंदू महिलांची अवस्था दिसत नाही का? जगभरातल्या हिंदूंचे पालकत्व घेतलेल्या रा. स्व. संघ आणि संबंंधित संघटना याबाबत संवेदनशील आहेत. मात्र, आता ‘मोहब्बतची दुकाने’ थाटणारे राहुल गप्प आहेत आणि उद्धव ठाकरेंनी तर बांगलादेशमधल्या परिस्थितीला ‘जनतेचा न्याय’ म्हटले आहे. काय म्हणावे?
मात्र, समाजमाध्यमे किंवा प्रसारमाध्यमांवर दिसणारी बांगलादेशीय हिंदूंची स्थिती प्रत्यक्षात याहीपेक्षा भयंकर. बांगलादेशमध्ये हिंदू स्त्रियांवर आणि मुलींवर अनन्वित अत्याचार होत आहेत. बांगलादेशातील हिंदूंच्या व्यथा सांगणारे पत्र तिथल्या इयत्ता बारावीमध्ये शिकणार्या हिंदू मुलीने समाजमाध्यमांवर पोस्ट केले. ती म्हणते, ”इथे हिंदूंवर भयंकर अत्याचार होत आहेत. हिंदू महिलांनाच लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केले जात आहेत. हे अत्याचार शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आम्हाला माहिती आहे की, भारत सरकारलाही आमची काळजी वाटत आहे. भारत सरकारने आणि पंतप्रधान मोदींनी आम्हाला तत्काळ मदत करावी. मदतीला जितका उशीर होईल, तितके आमचे जास्त नुकसान होईल.”
आरक्षणाच्या कोट्यावरून सुरू झालेले आंदोलन शेवटी महाभयंकर विनाश बनून कोसळले, ते तिथल्या हिंदूंवरच! बांगलादेशनिर्मितीमध्ये बांगलादेशातील हिंदूंचे योगदानही मोठे होते. मात्र, बांगलादेशच्या कृतघ्न कौमवाल्यांना या सगळ्यांचे काय घेणे देणे? मिळेल त्या वस्तू अगदी कपडे, शिजवलेले अन्न, ते संडासचे भांडेही लुटण्यात ते मग्न होते. लुटालुटीची संस्कृती रक्तात भिनलेले हे लोक. इथे हिंदूंची संपत्ती आणि इज्जत, जीव कसा सुरक्षित असणार? या हिंसेला पाकिस्तान आणि चीनकडून फंडिंग झाले, अशा बातम्या आहेत. त्या आर्थिक मदतीच्या जोरावरच बांगलादेशची अराजकता प्रदीर्घकाळ टिकली.
1971 सालची आठवण सांगताना अनेक बांगलादेशी हिंदूंनी त्यांच्या धर्मांतराबद्दल वाच्यता केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, तेव्हा लढाई जरी पाकिस्तान आणि पूर्व बंगालची झाली, तरी दोघांच्याही निशाण्यावर बांगलादेशचे हिंदू पहिले होते. त्यामुळे जीवाच्या भीतीसाठी ते आणि त्यांचे कुटुंब मुस्लीम झाले. त्यानंतरही लोक त्यांच्यावर बारीक नजर ठेवून होते. घरात देव वगैरे आहेत का, गुपचूप पूजा तर करत नाहीत. घरातल्या बायका सिंदूर वगैरे लावतात का? रमजानच्या महिन्यात आजूबाजूच्या बायका अचानक घरात घुसून स्वयंपाकघर तपासत. का तर रोजा न पकडता यांनी अन्नग्रहण केले का? तर पुरुषांना ऊठसूट नमाज-सुरा याबद्दल प्रश्न विचारले जात. असो.
बांगलादेशात 18 टक्के असलेला हिंदू त्यानंतर आठ टक्क्यांवर आला. आता या आठ टक्के हिंदूंच्या जीवावर तिथले ते हिंसक लोक उठले आहेत. पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतातल्या काही उपद्रवी झुंडींना पाहून वाटते की, संस्कृती-संस्कार हे माणसांना बांधून ठेवतात. ज्यांचा माणूसपणाशी काडीचाही संबंधच नाही. त्यांच्या मते, संस्कार-संस्कृती चिरडण्यासाठीच असते. या परिक्षेपात ‘न हिंदू पतितो’ असा मंत्र मन-विचारात आणि कृतीतही जागवणार्यांनी असेल तिथे संघटित होऊन असल्या राक्षसी वृत्तींची नांगी वेळीच ठेचण्याशिवाय पर्याय नाही!
9594969638