वक्फ बोर्डाची देशात जमीन किती? दिल्लीसारखी तीन राज्ये एकत्र केल्यास होईल तेवढी!
08-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली : वक्फ बोर्ड (Waqf Board) देशातील विविध जिल्ह्यंमधील वास्तूंवर तसेच जमीनींवर दावा करत आहे. यावरून वक्फ बोर्डाला न्यायालयाने अनेकदा फटकारले आहे. भारतीय वक्फ बोर्डाची जमीन किती आहे?, असा अनेकांना सवाल उपस्थित झाला असेल. दिल्लीत तब्बल ३ लाख एकरपर्यंत वक्फ बोर्डाची जमीन आहे. रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयाहून अधिक जमीन वक्फ बोर्डाकडे आहे. तसेच देशात वक्फ बोर्डाकडे ९ एकर जमीन आहे.
वक्फ म्हणजे काय?
वक्फ हा अरबी शब्द आहे. अरबी भाषेतील वकूफा या शब्दापासून 'वक्फ' शब्द वापरण्यात येऊ घातला. इस्लाम धर्मात वक्फ म्हणजे दान करण्याची एक पद्धत आहे. ‘औकाफ प्रॉपर्टीज इन्वेस्टमेंट फंड’ ही संस्था वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर लक्ष केंद्रीत करत असते. इस्लाम धर्मात वक्फ म्हणजे देवाच्या नावाने दान केलेली संपत्ती. दिलेले दान हे अनाथालये बांधण्यासाठी, कब्रिस्तान बांधण्यासाठी खर्च केला जातो.
दरम्यान, वक्फमध्ये हिंदू लोकं आपली संपत्ती दान करू शकतात का? असा सवाल अनेकदा उपस्थित होतो. दान करणारी व्यक्ती ही इस्लाम धर्मासोबत जोडली गेली पाहिजे, असे सांगितले गेले आहे. दरम्यान, १९४७ मध्ये भारताची फळणी झाली होती. त्यावेळी अनेक मुस्मिम बांधव हे पाकिस्तानात गेले. तर काही हिंदू हे पुन्हा भारतात आले होते. त्यावेळी १९५५ साली भारतात नव्याने वक्फ बोर्ड कायदा लागू केला. त्यात पलायन केलेल्या मुस्लिम बांधवांच्या संपत्तीचा समावेश करण्यात आला होता. भारतात सध्या ३० हून अधिक वक्फ बोर्ड आहेत.
भारतातील वक्फ बोर्डाला कोणतेही प्रशासनाचे नियम नाहीत. ज्याप्रमाणे पाकिस्तानातील वक्फ बोर्डावर प्रशासनाची नजर असते. तसेच भारतातील मंदिरांचे ट्रस्ट, संस्थांचे ट्स्ट यावर भारतातील प्रशासन नियंत्रण ठेऊन असते. मात्र वक्फ बोर्डाबाबत तशी परिस्थिती दिसून येत नाही. दरम्यान याचपार्श्वभूमीवर केंद्र सरकार वक्फ बोर्डात काही बदल करणार आहे. त्याची सध्या सुनावणी सुरू आहे.