मोठा खुलासा! विनेशचं वजन आधीच दोन किलो वाढलं होतं!

07 Aug 2024 15:36:30
vinesh phogat disqualiffication


नवी दिल्ली :     भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरविण्यात आले. ५० किलो वजनी गटात विनेश फोगाटचे १५० ग्रॅम वजन वाढल्याने तिला डिसक्वालिफाई करण्यात आले असून यावर आता देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विनेश फोगाटचा परफॉरमन्स पाहता सुवर्णपदकाची संधी हुकण्याची सुतराम शक्यता नसताना भारताला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. बजरंग पुनियाने म्हटले की, कुस्तीपूट विनेश फोगाटचे वजन आधीच २ किलोने वाढले होते. तसेच, विनेशलाही हे माहीत होतं त्यामुळे तिने रात्रभर वजन कमी करण्यासाठी मेहनत घेतली. तो पुढे म्हणाला, विनेशचे सामान्य वजन ५३ किलो असून तिला ५० किलो वजन नियंत्रणात ठेवण्याची अपार मेहनत घ्यावी लागली, असे बजरंग पुनिया याने म्हटले आहे.

तो पुढे म्हणाले, विशेषतः मुलींना वजन कमी करण्यात खूप त्रास होतो. खूप प्रयत्नांनंतर तिचे वजन कमी झाले पण तरीही १०० ग्रॅम अधिक दिसून आले. तसेच, दहा ते वीस ग्रॅम वजन अर्ध्या तासात कमी करता येते. परंतु शंभर ग्रॅम वजन इतक्या कमी वेळेत कमी करता येत नाही, असेही बजरंग पुनियाने यावेळी स्पष्ट केले आहे.


 
Powered By Sangraha 9.0