मोठी बातमी! विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून बाहेर, कारण...

07 Aug 2024 14:09:03
 
Vinesh Phogat
 
पॅरिस : पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळण्याची आशा लागली असताना आता भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. काही ग्रॅम वजन वाढल्यामुळे तिला या स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे.
 
विनेश फोगाटने मंगळवारी ५० किलो कुस्तीची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर ती सुवर्णपदक जिंकेल, असा विश्वास भारतीयांना वाटत होता. मात्र, केवळ १०० ग्रॅम वजन वाढल्यामुळे अंतिम फेरी खेळण्यासाठी तिला अपात्र ठरवण्यात आले आहे.
 
विनेश फोगाट याआधी ५३ किलो वजनी गटात खेळायची. पण ऑलिम्पिकसाठी तिने ३ किलो वजन कमी केलं आणि ती ५० किलो वजनी गटात खेळली. तिने अनेक कुस्तीपटूंचा सामना करत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे आता भारताच्या नावावर सुवर्णपदकाची नोंद होणार, अशी आशा सर्वांना लागली होती. परंतू, आता तिला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.
 
पतप्रधान नरेंद्र मोदींनी केला पाठपुरावा!
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी विनेश फोगाटच्या ऑलिम्पिक अपात्रतेविषयी IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी बोलले असून विनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी पी टी उषा यांना विनेशच्या केसमध्ये मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले आहे. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, असेही मोदींनी पीटी उषा यांना सांगितले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0