Netflix पाहणाऱ्यांना आता आवडत्या वेब सीरिज, चित्रपट पाहणं होणार खर्चिक

07 Aug 2024 16:33:58

netflix  
 
 
मुंबई : जगभरात नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीचे करोडो चाहते आहेत. पण आता नेटफ्लिक्सच्या चाहत्यांना आवडता कंटेन्ट पाहण्यासाठी थोडे अधिकचे पैसे खर्च करावे लागणार आहे. या वर्षाच्या अखेरीस त्याच्या निवडक प्लॅनची किंमत वाढू शकते असा अंदाज मांडला जात आहे. स्लॅशडॉटने दिलेल्या अहवालानुसार, जेफरीज नावाच्या एका संशोधन संस्थेने दावा करण्यात आला आहे की, Netflix डिसेंबर २०२४ पर्यंत त्याच्या मानक आणि जाहिरात-समर्थित प्लॅनची किंमत वाढीची घोषणा करू शकते.
 
दरम्यान, नेटफ्लिक्सच्या स्टॅण्डर्ड प्लॅनची किंमत जानेवारी २०२२ मध्ये काही अंशी वाढवण्यात आली होती, त्यामुळे आता किमती पुन्हा एकदा वाढण्याटी दाट शक्यता आहे. सद्य स्थितीला उद्योगाच्या तुलनेत सर्वात कमी किंमतीत जाहिरात-समर्थित प्लॅनदेखील ऑफर केले जात असून कंपनीने अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्पोर्ट्सची कॅटेगरी देखील जोडली आहे. त्यामुळेच ही वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
यापूर्वी नेटफ्लिक्सने ऑक्टोबर २०२३ मध्ये त्याच्या मूलभूत आणि प्रीमियम योजनांच्या किमती वाढवल्या होत्या. संशोधन फर्मचा असा दावा आहे की, नेटफ्लिक्स बेसिक प्लॅनदेखील काढून टाकू शकते आणि त्याजागी २०२५ मध्ये नवीन प्लॅन आणण्याची योजना असून शकते. नेटफ्लिक्सवर लवकरच ख्रिसमस एनएफएल गेम, स्क्विड गेम २, WWE रॉ, स्ट्रेंजर थिंग्ज ५ अशा कलाकृती देखील प्रदर्शित होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0