देशातील प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहोरात्र झटत आहेत

06 Aug 2024 19:06:23

Lodha
 
मुंबई : महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची सखोल माहिती देणारे "करिअरच्या नव्या दिशा" हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.  लोढा यांच्या हस्ते "करिअरच्या नव्या दिशा" या पुस्तकाचे मुंबई महापालिका येथे प्रकाशन झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. मंत्री  लोढा म्हणाले की, "राज्यातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्याच्या दृष्टीने राज्याचा कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता विभाग गतिमानतेने कार्य करीत आहे. विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे.
 
कौशल्य विकास विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत नुकतीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली असून, या योजनेचा युवक युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. युवकांनी अधिक सक्रिय होऊन या संधींचा लाभ घेतला पाहिजे. स्वतः बरोबर देशाचे हित साधले पाहिजे. देशातील प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहोरात्र झटत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
पुस्तकाचे लेखक, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक  देवेंद्र भुजबळ यांनी परिश्रमपूर्वक, अतिशय अभ्यास करून लिहिलेल्या या पुस्तकाबद्दल मंत्री  लोढा यांनी त्यांचे अभिनंदन केले या पुस्तकात भारत सरकारच्या, महाराष्ट्र शासनाच्या आणि इतर राज्य सरकारांच्या मिळून जवळपास ७०० अभ्यासक्रमांची माहिती आहे. या पुस्तकामुळे युवकांना आपली आवड ओळखून करिअरची निवड करण्यास नक्कीच मदत होईल. आवडीनुसार करिअर निवडल्यास थकवा, कंटाळा, स्ट्रेस न जाणवून हे युवक आनंदाने आपले जीवन व्यतीत करू शकतील.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0