_202408062025334370_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
(Photo Credit : Mohmmed Zubair Twitter)
ढाका (Bangladesh Attack) : बांगलादेशात सुरू असलेल्या अराजकतेनंतर दुसरी लढाई सोशल मीडियावर सुरू झाली आहे. बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंविरोधात अमानुषपणे अत्याचार केल्याच्या व्हिडिओंचा महापूर आला आहे. कधी दुकानांची तोडफोड तर कधी घरात घुसण्याचा प्रयत्न, कट्टरपंथींनी कुणाच्या घरात मुली आहेत का याचा ठावठिकाणा शोधत असल्याच्याही अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. या सोबत त्यांनी पुराव्यादाखल व्हिडिओही प्रकाशित केले आहेत. मात्र, भारतातील अल्ट न्यूजचा फाउंडर जो स्वतःला कथित फॅक्ट चेकर म्हणवून घेतो त्याने केलेला कारनामा व्हायरल झाला आहे.
४ ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान हसीना शेख यांनी राजीनामा देत भारतात आल्या. असे असले तरीही बांगलादेशमधील आंदोलनाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. याप्रकरणामुळे सोशल मीडिया वॉर निर्माण होण्याची शक्यता आहे. काही तासांपासून सोशल मीडियावर बांगलादेशातील हिंदू सुरक्षित असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र त्यात किती तथ्य आहे हे सांगणे कठीण आहे.
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनानंतर हिंदू देव-देवतांची मंदिरे पेटवण्यात आली. तसेच अनेक हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यात आले. मात्र अशातच सोशल मीडियावर निर्विक रॉय नावाच्या X अकाऊंट युजर्सने बांगलादेशातील हिंदू सुरक्षित आहेत, असा दावा केला. निर्विकने केलेला दावा भारतातील X अकाऊंट युजर्स विजय पटेलने धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर फेक माहिती देत असल्याची पोस्ट विजय पटेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
नेमका दावा काय?
निर्विकने आपल्या ट्विटरवर, "बांगलादेशमधील हिंदू सुरक्षित आहेत. मी एक हिंदू आहे आणि मी बांगलादेशात सुरक्षित आहे. आम्ही बांगलादेशची पुनर्बांधणी करू, आम्ही सर्व एकत्र आहोत", असे ट्विट निर्विक रॉय या X ट्विटर हँडेलवरून करण्यात आले. मात्र, भारताच्या विजय पटेल यांनी ही बातमी खोटी आहे असे सांगितले आहे.
विजय पटेल काय म्हणाले?
"X ट्विटर अकऊंटवरून निर्विक रॉय नावाने उघडलेले अकाऊंट खोटे असल्याचा दावा विजय पटेल यांनी केला आहे. निर्विक यादव नावाचे अकाऊंट काल ५ ऑगस्ट रोजी उघडण्यात आले आहे. तसेच हेच ट्विट स्वतःला कथित फॅक्ट चेकर म्हणवणाऱ्या मोहम्मद जुबेरने रिट्विट केले. निर्विक रॉयने बांगलादेश येथील हिंदू सुरक्षित असल्याचे ट्विट केले. मात्र ही बातमी खोटी आहे असा दावा विजय पटेल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला.