हिंदू पत्रकार-नेत्यांच्या क्रूर हत्या! मंदिरांवर हल्ले, बांग्लादेशात हिंदू बनले शिकार!

05 Aug 2024 19:49:55

Sheikh Hasina Photo
 
ढाका : बांगलादेशातील अराजकतेमुळे पंतप्रधान हसीना शेख (Sheikh Hasina Resign) यांना राजीनामा देऊन देशाबाहेर पळावे लागले आहे. सोमवार, ५ ऑगस्ट रोजी त्यांचे विमान गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर उतरले. हा भारतीय वायुसेनेचा हवाई अड्डा आहे. AJAX1431 कॉल चिन्हांकित C-130 एयरक्राफ्ट भारताच्या सीमेत दाखल झाले त्यावेळी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्यावर लक्ष ठेवले होते. हे विमान पाटणाहून उत्तर प्रदेशात दाखल झाले. शेख हसीना नवी दिल्लीहून लंडनला जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
 
शेख हसीनांनी बांगलादेश सोडल्यानंतर तिथले सेनाध्यक्ष वकार-उज-जमान यांनी विरोधी पक्षांशी चर्चा करून सरकार स्थापन करणार असल्याची माहिती दिली. दंगेखोरांनी बांगलादेशची राजधानी ढाकाच्या धानमंडी स्थित ‘सुधा सदन’ला आगीत भस्मसात केले. लुटमार सुरू केली. त्यानंतर पंतप्रधानांच्या ‘गण भवन’मध्ये घुसून सामानाची नासधुस सुरू केली. दरम्यान यात एका हिंदू पत्रकाराची हत्या झाली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 
 
 
या सर्व हिंसाचारावेळी हरधन रॉय नावाच्या हिंदू नगरसेवकाला मारहाण करण्यात आली. याशिवाय इस्कॉन टेंपल तसेच बांगलादेशातील हिंदू धर्मस्थळांची तोडफोड करण्यात आली. काली मंदिरात घुसून तोडफोड केली. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या प्रकरणामुळे हिंदू भयभीती झाले आहेत. पत्रकार प्रदीप कुमार भौमिक यांची हात्या करण्यात आली.
 
याचपार्श्वभूमीवर बांगलादेशातील अल्पसंख्यांकांची सुरक्षा सुनिश्चित करावी, असे मोदी सरकारने बांगलादेशातील नवीन लष्कराला स्पष्ट करावे, असे बांगलादेशातील हिंदूंचे म्हणणे आहे. भारतातील अनेक डाव्या विचारसरणीचे आणि युवा शक्ती तसचे लोकशाहीचा विजय म्हणत गौरव करत आहेत. तर देशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोट करून विटंबना करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0