मोठी बातमी! बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा! प्रचंड हिंसाचारानंतर देश सोडून जाण्याची वेळ

05 Aug 2024 15:54:00
 
Sheikh Haseena Resign
 
 (Sheikh Haseena Resign)
 
ढाका : बांगलादेशच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशवासी शेख हसीना (Sheikh Haseena Resign) यांच्या पंतप्रधानपदच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले होते. अशातच आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. केवळ बांगलादेशच नाहीतर जागतिक पातळीवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शेख हसीना आपल्या बहिणीसोबत बांगलादेश सोडून अज्ञातस्थळी रावाना होण्याचा निर्णय घेतला आहे.
 
बांगलादेशमध्ये सध्या अस्थिर वातावरण आहे. त्यामुळे शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू होतं. पंतप्रधान शेख हसीना या भारताच्या दिशेने रवाना झाल्या असल्याची चर्चा आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशमध्ये कोणाची सत्ता येणार असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. बांगलादेशमध्ये हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशमध्ये लष्करांची सत्ता असेल असे बोलले जात आहे.
 
 
 
बांगलादेश येथे जुलैपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं होतं. नोकरीत असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. या मागणीनंतर शेख हसीना यांनी कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही. यामुळे आंदोलकांनी शेख हसीना यांची मागणी लावून धरली. या हिंसकल आंदोलनात ३०० हून अधिक नागरिक मारले गेले. तसेच काही बांगलादेश पोलिस देखील मृत्यूमुखी पडले.
 
 
Powered By Sangraha 9.0