रानभाज्यांचा आस्वाद देणारा रानभाजी महोत्सव
05-Aug-2024
Total Views | 62
रोहिणी कृषी पर्यटनातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १८ ऑगस्ट रोजी पालघरमधील रोहिणी कृषीपर्यटन, लेले पाडा येथे सकाळी ९:३० ते दुपारी २ या वेळेत हा महोत्सव होणार आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यदायी रानभाजांचा आस्वाद घेण्याची संधी या महोत्सवात मिळणार आहे. या महोत्सवासाठी नोंदणी शुल्क ६०० रुपये आहे. रोहिणी कृषी पर्यटनातर्फे ६ वर्षांपासून या महोत्सवाचे केले जात आहे. या महोत्सवासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि नोंदणी करण्यासाठी ९२८४०६७१२०, ९८६०१६१६३२, ९४२२६८२१२३ या क्रमांकावर संपर्क साधावा.