‘चारचौघी’ नाटक घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘या’ तारखेला होणार शेवटचा प्रयोग

05 Aug 2024 17:40:55

chauchaughi  
 
 
मुंबई : मराठी रंगभूमीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. काही नवी नाटकं तर काही जुनी नाटकं पुर्नजिवित्त करुन त्याचे सादर केले जाणारे प्रयोग प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. अशा अनेक अजरामर नाटकांपैकी एक नाटक म्हणजे १९९० ते २००० पर्यंत दबदबा राखणारं नाटक चारचौघी. आणि ३१ वर्षांनंतर नव्या कलाकारांसह दमदार कमबॅक करणारं 'चारचौघी' हे नाटक आता पुन्हा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
 
चारचौघी हे नाटक स्त्री-पुरुष संबंधांवर नवीन प्रकाश टाकते. ‘चारचौघी‘ नाटक चार विविध वयोगटातील महिलांचा प्रवास आहे. स्त्रीयांच्या भावभावना, त्याचं अंतर्मन याचा लेखाजोखा आज तीन दशकानंतरही आपल्याला थेट भिडतो हा समाजाच्या मनोवृत्तीचा विजय की पराभव? हा प्रश्न रसिकांना निश्चितच सून्न‌ करून सोडेल, असं हे नाटक आहे.
 
मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, पर्ण पेठे आणि कादंबरी कदम या चार अभिनेत्रींची प्रमुख भूमिका असणाऱ्या या नाटकाचा शेवटचा प्रयोग रविवार दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्यातील राम कृष्ण मोरे नाट्यगृहात होणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0