'Love Jihad' चा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड

04 Aug 2024 18:11:35

Love Jihad 
 
लखनऊ (Love Jihad) : उत्तरप्रदेशमधील आग्रा येथे एका कट्टरपंथीय युवकाने हिंदू युवतीसोबत लव्ह जिहाद (Love Jihad) केल्याचा प्रकार घडला आहे. एखाद्या चित्रपटासारखी घटना आग्रा येथे घडली आहे. सध्या अनेक युवक आणि युवती सोशल मीडियाचा वापर करताना दिसत आहेत. मात्र,कट्टरपंथी युवकाने इंस्टाग्रामवरील आपलं खरं नाव लपवून युवतीसोबत प्रेमसंबंध ठेवले. त्यानंतर पुढे जे ही घडले त्यामुळे पायाखालील जमीन हादरली.
 
मुश्ताक असं आरोपीचं नाव असून त्याने आपलं मूळ नाव बदलून राजू नाव ठेवलं होतं. मुश्ताक कपाळावर गंध लावत असे. या घटनेवर हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला. हे प्रकरण आग्रा येथील सदर पोलीस ठाणे परिसरात ३० जुलै रोजी घडले. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आग्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी मुलगी ही सकाळी ७ वाजता शाळेत गेली. फारूखाबाद येथील मुश्ताक उर्फ राजूसोबत तिची भेट झाली. युवकाने पीडित अल्पवयीन मुलीला फूस लावली आणि तिला सोबत घेऊन गेला. याविरोधात पीडित मुलीच्या वडिलांनी कारवाईची मागणी केली.
 
या तक्रारीनंतर आग्रा पोलिसांनी मुश्ताकविरोधात भारतीय न्यासंहिता कलम १३७(२) आणि ७८ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पीडितेला घेऊन आरोपी फरार झाला. त्याच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली. सध्या आरोपीचा शोध घेण्यात आला आहे. मात्र पीडितीला सुखरूप बाहेर काढले जाईल, असं पोलिसांनी आश्वासन दिले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0