मुंबई - संगीतकार कृणाल घोरपडे उर्फ क्रेटेक्स याने संगीतबद्ध केलेले आणि गायक श्रेयस सागवेकर याने श्रेयस सागवेकर याने गायलेले ‘तांबडी चांबडी’ हे मराठी गाणे स्पिनिंग रेकॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय संगीत कंपनीच्या चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. या चॅनलवर प्रदर्शित होणारे हे पाहिलेच मराठी गाणे आहे. त्यामुळे आता हे मराठी गाणे जगभर वाजणार आहे. हे गाणे स्वत: गायक श्रेयस सागवेकर याने लिहिले आहे आणि संगीतकार क्रेटेक्स (कृणाल घोरपडे) याचे या गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण झाले आहे. या गाण्याची निर्मिती वर्ल्ड ऑफ वाइब्ज आणि रॉक कच्ची यांनी केली आहे. तेजस शेट्ये, मनीष शेट्ये, वृशाली शेट्ये, निनाद सावंत, आकाश साळुंखे, माटिन शेख, मल्हार जाधव, यश माधव, रूपेश किंगरे, अवंतिका चौघुले, आशिष नेगी, धनंजय जाधव आणि अनिकेत सोंडे या कलाकारांनी या गाण्यात अभिनय केला आहे.