भरचौकात कट्टरपंथींची नमाज अदा, पोलिसांनी हकलवताच वादाला तोंड फुटले
31-Aug-2024
Total Views |
लखनऊ : कट्टरपंथी उत्तर प्रदेशच्या बरेली येथील आला हजरत यांच्या उरूसावेळी आले होते. यावेळी त्यांनी बरेलीच्या रस्त्यावर तसेच चौकात नमाज आदा करण्यास सुरूवात केली होती. मात्र पोलिसांनी त्यांना त्याठिकाणाहून हकलवून लावले होते. यावरून कट्टरपंथी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. जवळच उरूस असून त्याठिकाणी जाऊन तुम्ही नमाज अदा करावी असे पोलिसांनी सांगितले होते. याच प्रकरणावरून वादाला तोंड फुटले.
ऑल इंडिया रजा एक्शन कमिटीचे युवा शाखेचे अध्यक्ष मौलाना अब्दुल्ला रझा कादरी यांनी रस्त्यावरील नमाज अदा करणाऱ्यांना हटवल्याने संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, पोलिसांनी नमाज अदा करणाऱ्यांसोबत गैरवर्तन केले असून पोलिसांना निलंबित करण्यात यावे, ते म्हणाले की, गुरूवारी काही लोकांनी पोस्टर फाडले होते आणि त्यांचीही ओळख पटवून त्यांच्यावर त्वरीत कारवाई करवी अशी मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कट्टरपंथींनी उरूसावेळी खजुरिया जुल्फिकार परिसरात नमाज अदा करायला सुरूवात केली. यावरून त्यांचे गावातील हिंदू गटाशी वाद झाला असून शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी मिरवणूक काढण्यात आली. त्याचवेळी गावात राहणाऱ्या हिंदूंनी याला विरोध केला आहे.
इज्जनगर पोलीस ठाणे निरिक्षक यशपाल सिंहांनी सांगितले की, गावातून मिरवणूक आली नाही. यावेळी काहींनी मिरवणूक काढल्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मिरवणुकीचा निषेध करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. नंतर गावाभोवती असलेल्या ३०० मीटर परिसरात कोणीही येऊ नये, कोणाचीही मिरवणूक येऊ देणार नाही असा दावा करण्यात आला होता. मात्र याप्रकरणावर दोन्ही बाजूने एकमत झाले. जर कट्टरपंथींनी मिरवणूक काढली तर त्याला आमचा विरोध नसेल असे सांगण्यात आले होते.