तृणमूल विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्या मोर्चास विद्यार्थीनींचा नकार, शिक्षा म्हणून बाथरूममध्ये डांबून ठेवले

    31-Aug-2024
Total Views |
 
Trinamool Congress
 
कोलकाता : आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकरण सध्या ताजे असून देशातील अनेकांनी याप्रकरणाला विरोध दर्शवला आहे. याप्रकरणी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर भाजपने आंदोलन केले. अशातच तृणमूल काँग्रेसची युवा शाखा असलेल्या तृणमूल विद्यार्थी काँग्रेसच्या १३ विद्यार्थींनींचे प्रकरण आढळले आहे. विद्यार्थींनींनी कार्यक्रमाला जाण्यास नकार दिल्याने काही विद्यार्थींनींना कॉमन टॉयलेटमध्ये डांबण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
 
शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून संघटनेने मोर्चा काढला होता त्यात विद्यार्थींनींनी आपला सहभाग दाखवला नाही. यानंतर त्याच विद्यार्थींनींना एक कॉमन बाथरूममध्ये बंद खोलीत ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे काही पीडित विद्यार्थींनींची प्रकृती बिघडली आहे. रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी या घटनेत आमचा काहीही संबंध नसून आरोप फेटाळून लावले आहेत.
 
महाविद्यालयाच्या प्रशासकीय समितीत उत्तर बंगालचे विकास मंत्री उदयन गुहांचा समावेश आहे. यावेळी ममता बॅनर्जींवर होणाऱ्या आरोपांना पाठिशी घालत म्हणाले की, ममता बॅनर्जींकडे बोट दाखवणाऱ्यांची बोटे मोडली जातील, असे उदयन गुहांनी आंदोलनाबाबत सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य अब्दुल अवल यांनी या घटनेवर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. या घटनेची माहिती मिळाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
तसेच मुलींच्या कुटुंबियांनी याप्रकरणी कोणतीही एक तक्रार केली नाही. आर जी कर प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थींनींनी मोर्चात जाऊन, आंदोलनात जाऊन न्याय मागितला. मात्र त्याच विद्यार्थींनींनी तृणमूल विद्यार्थी संघटनेत जाण्यास नकार दिल्याने त्यांना कुलूप लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.