महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाला अद्याप परवानगी नाही!
31-Aug-2024
Total Views |
मुंबई : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ १ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, या आंदोलनाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे उद्याचे आंदोलन होणार की, नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
रविवार, १ सप्टेंबर रोजी दुपारी ११ च्या सुमारास हुतात्मा स्मारकास वंदन करून गेटवे ऑफ इंडियाला उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन होणार आहे. या आंदोलनात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी होतील. परंतू, या आंदोलनाला आता काहीच तास शिल्लक असताना अजूनपर्यंत पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. तरीसुद्धा महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करण्यावर ठाम आहे. त्यामुळे आता हे आंदोलन होणार की, नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.