महिलांचा अनादर करणाऱ्यांना मोकळं सोडलं जाणार नाही; उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

    31-Aug-2024
Total Views |
 
Fadanvis
 
नागपूर : महिलांचा अनादर करणाऱ्यांना मोकळं सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. शनिवारी नागपूरमध्ये आयोजित लाडकी बहिण योजनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. तसेच आपल्याला आई-वडील म्हणून आपल्या मुलांना समजावून सांगण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज समाजात मोठ्या प्रमाणात महिलांबाबत अपराध होतात. समाजाला एक कीड लागली आहे. आम्हाला माता-पिता म्हणून आमच्या परिवारातील मुलाला समजावून सांगावं लागेल. महिला या आपल्या माता-भगिनी आहेत. त्यांच्यामुळेच आपण आहोत. माता नसती तर कोणीच जन्माला आलं नसतं, ही शिकवण देऊन त्यांच्या मनात महिलांप्रति आदर निर्माण करणं गरजेचं आहे."
 
हे वाचलंत का? -  लाडकी बहिण योजना आणून आम्ही काही चूक केली का? फडणवीसांचा सवाल
 
"त्याचवेळी जे लोक महिलांचा अनादर करतील आणि त्यांच्याविरुद्ध अपराध करतील त्यांनादेखील मोकळं सोडलं जाणार नाही. आवश्यकता पडल्यास त्यांना फाशीची शिक्षा देण्याचा मानस आमच्या सरकारने केला आहे," अशी ग्वाही त्यांनी दिली.