अवनी लेखराने रचला इतिहास, सबंध भारताचे स्वप्न पूर्ण करत सुवर्ण पदकाला घातली गवसणी

    30-Aug-2024
Total Views |
 
Avani Lekhara Gold Medal
 
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अवनी लेखरा (Avani Lekhara) या शूटरने सुवर्ण पदक पटकावले आहे. एअर रायफल स्टँडिंग एसएच १ खेळाच्या प्रकारात अवनीने इतिहास रचत सुवर्णपदकाला गवसणी घालत सबंध भारताचे स्वप्न पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे भारताच्या मोना अगरवालने याच खेळात कांस्य पदक पटकावून इतिहास रचला आहे. यामुळे देशाला दुहेरी आनंद मिळाला आहे.
 
अवनीने याआधी टोक्योमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा पॅरालिम्पिकमध्ये तिने सुवर्णपदक मिळवत मोठी झेप घेतली. यामध्ये तिने २४९.७ गुणांची कमाई केली. तसेच कांस्य पदक विजयी होणाऱ्या मोना अगरवालने २२८.७ गुणांची कमाई केली आहे. तर रौप्य पदक हे दक्षिण कोरियाच्या युनरी लीच्या नावावर राहिले.
 
 
 
अवनी लेखरा ही एका उत्कृष्ठ स्टार पॅरा नेमबाज आहे. तिने दोन वेळा सुवर्णपदक पटकावून देशाचे स्वप्न साकार केले. टोक्योच्या पॅरालिम्पिकमध्येही तिने सुवर्णपदक जिंकले होते. गेल्या १२ वर्षांआधी अवनीचा अपघात झाला होता. त्यावेळी अवनीच्या शरिराच्या खालच्या भागात लकवा मारला होता. मात्र तिने आपली जिद्द सोडली नाही. तिच्या पाठिला दुखापत झाली होती. तिने अभिनव बिंद्राची प्रेरणा घेऊन आपले ध्येय साध्य केले आणि तिने एकदा नाहीतर दोन वेळा सुवर्णपदकाला गवसणी घातली.