संजय राऊत, लाचारीच्या विषाणूने अशक्त झालात, स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या!

30 Aug 2024 18:28:07
 
Sanjay Raut
 
मुंबई : लाचारीच्या विषाणूने अशक्त झाला आहात. थोडासा स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या, असा खोचक टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना लगावला आहे. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गृहमंत्रीपदावरून टीका केली होती. यावर आता केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिले.
 
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "काँग्रेसपुढे कण्यातून वाकलेले आणि स्वहस्ते पक्षाची शकले केलेले जेव्हा दुसऱ्यांना हिणवण्याचे शाब्दिक चाळे करतात, तेव्हा हसून दुर्लक्ष करणंच योग्य असतं. संजय राऊत, तुम्हीच थोडासा स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या आणि एखाद-दुसरा चमचा उद्धवजींना पण द्या. लाचारीच्या विषाणूने तसेही तुम्ही अशक्त झाला आहात."
 
 
हे वाचलंत का? - वाढवण बंदर महाराष्ट्राच्या प्रगतीचं नवं शिखर ठरणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
"त्यामुळे येत्या निवडणुकीत तुम्ही टिकाव धरण्याची शक्यता नाही. म्हणूनच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सशक्त आहेत की, अशक्त याची उठाठेव करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष सलाईनवर का गेलाय, याचं आत्मपरिक्षण करा," अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0