काँग्रेसला धक्का! अखेर 'त्या' आमदाराचा राजीनामा

    30-Aug-2024
Total Views |
 
Congree
 
नांदेड : काँग्रेसचे देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्यावर क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप होता.
 
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची ७ मतं फुटल्याचा दावा करण्यात आला होता. यात जितेश अंतापूरकर यांचेही नाव समोर आले होते. त्यानंतर क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याचे आदेश काँग्रेस हायकमांडने दिले होते. या आमदारांना विधानसभा निवडणूकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचीही माहिती पुढे आली होती.
 
हे वाचलंत का? -  नांदेड जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार!
 
दरम्यान, आता जितेश अंतापूरकर यांनी स्वत:च सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. जितेश अंतापूरकर यांना अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जाते. राजीनामा दिल्यानंतर आता ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.