धक्कादायक! आंध्र प्रदेशातील मुलींच्या वसतीगृहात सापडला छुपा कॅमेरा, ३०० हून अधिक व्हिडिओ व्हायरल

    30-Aug-2024
Total Views |
 
Hidden Camera 
 
अमरावती : अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहातील स्वच्छतागृहात छुप कॅमेरा (Hidden camera) 
लावण्यात आल्याचे आढळून आले आहे. याविरोधात विद्यार्थींनींनी निदर्शने सुरू केली आहेत. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एसआर गुडवल्लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरूवारी ही धक्कादायक घटना घडली होती. याविरोधात वसतीगृहातील मुलींनी याविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनेला जाब विचारून सुरक्षेसाठी पावले उचलावीत अशी विनंती केली आहे. याप्रकरणी ३०० हून अधिक व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती आहे.
 
मुलींच्या वसतीगृहात छुपा कॅमेरा लावल्याने अनेक संबंधित विद्यार्थींनींचे व्हिडिओ मुलांच्या वसतीगृहात प्रसारित करण्यात आले आहेत. याप्रकरणात एका विद्यार्थ्यांला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान हा विद्यार्थी अंतिम वर्षातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
 
 
घटनेचा उलगडा कसा झाला?
 
आंध्र प्रदेशातील जिल्ह्यातील एसआर गुडवल्लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात काही मुलींना छुपा कॅमेरा ठेवल्याचे आढळून आले होते. या घटनेने संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थींनींनी संताप व्यक्त करत गुरूवारी सायंकाळी घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत शुक्रवारी सकाळपर्यंत निदर्शने दर्शवली. यावेळी त्यांनी संबंधित महाविद्यालयातील प्रशासनाला आम्हाला न्याय मिळवून द्या, आम्हाला सुरक्षा हवी आहे, असे म्हणत त्यांनी महाविद्यालयाच्या आवारात आवाज उठवला.
 
याप्रकरणात पोलिसांनी दखल घेतली असून वसतीगृहात ठेवलेला छुपा कॅमेऱ्याचे तब्बल ३०० विद्यार्थीनीचे व्हिडिओ मुलांच्या वसतीगृहात एका विद्यार्थ्याने व्हायरल केल्याचे बोलले गेले आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून विद्यार्थींनींचे काही व्हिडिओ समोर आल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली असून वसतीगृहाच्या स्वच्छतागृहात जाण्यावरही खेद व्यक्त केला आहे. याप्रकरणात जबाबदार असणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.