राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट! नेमकं कारण काय?

03 Aug 2024 13:27:10
 
Shinde & Raj Thackeray
 
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शनिवारी, मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली असून यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
 
यावेळी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील,मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर,अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  "अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून..."; सचिन वाझेंचा गौप्यस्फोट
 
तसेच राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव दीपक कपूर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर,तसेच गृह विभाग वित्त विभाग, एमएमआरडीए आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0