एआयच्या मदतीने कॉर्पोरेट विश्वाचा चेहरा मोहराच बदलणार! काय म्हणाले मुकेश अंबानी?
डीप टेकच्या वापराद्वारे कंपनीला जागतिक टेक कंपनी बनविण्याचे लक्ष्य
29-Aug-2024
Total Views |
मुंबई : (Reliance AGM 2024) : रिलायन्स समुह हा भविष्यात अत्याधुनिक तंत्रसुसज्ज अशा कंपनीत बदलणार असून कुत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर मानवी जीवनातील विकासाची कास आणि सध्यस्थितीतील समस्यांवर मात करण्यासाठी नव्या वाटा सुरू करणार असल्याची घोषणा अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी दिली. रिलायन्स समुहाच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. रिलायन्स समुह कंपनीला नव्या स्तरावर घेऊन जाण्यास तयार असून येत्या काही वर्षांत कित्येक वर्षात कंपनीचे मुल्य वाढत जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अंबानी म्हणाले, "डीप टेक आणि अॅडव्हास टेक्नॉलोजीला रचनात्मक पद्धतीने रणनिती आखून रिलायन्स भविष्यात जगातील ३० अग्रगण्य कंपन्यांमध्ये स्थान मिळवेल. भविष्य हे भूतकाळातील गोष्टींपेक्षाही अधिक उज्वल असणार आहे. जिओ सध्या एका प्रमुख तंत्रज्ञान कंपनी म्हणून उभी राहिली आहे. मानवी जीवनाशी निगडीत अडचणींवर मात करण्यात एक सक्षम संस्था म्हणून उभी राहिली."
ते म्हणाले, "रिलायन्स समुह आता तंत्रज्ञान कंपनी म्हणून उभारी घेत आहे, हे आपण यापूर्वीच पाहिले आहे. क्रांतीकारी बदल घडविणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्या आता भविष्यात कॉर्पोरेट जगतासाठीही सर्वसंपदा उपलब्ध करून देणार आहेत. रिलायन्सने आपल्या वृद्धीत कायमच विकास मंत्र जपला आहे. विविध प्रकारे रिलायन्स तंत्रज्ञान कंपनी म्हणून उभी राहण्याच्या प्रयत्नात आहे. आपले प्रतिभाशाली अभियंते, वैज्ञानिक आपल्या उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत करेल. आम्ही सर्व रिलायन्स कंपन्यांसाठी एआय केंद्रीत डिजिटल यंत्रणा तयार केली आहे."
रिलायन्सने २०२३-२४ या वर्षात संशोधनावर ३६४३ कोटींहून अधिक खर्च केला आहे. ज्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये हा खर्च ११ हजार कोटींहून अधिक झाला आहे. आम्ही सर्व प्रकारच्या व्यवसाय आणि महत्वाच्या योजनांवर हजारहून अधिक वैज्ञानिक आणि संशोधकांची मदत घेतली आहे. रिलायन्स समुहाने २५५५हून अधिक पेटंट दाखल केले आहेत. ज्यात मुख्य स्वरुपात जैव-उर्जा नवाचार, सौर आणि हरित उर्जा स्त्रोतांच्या मुल्य रसायन क्षेत्राचा सामावेश आहे.
अंबानी म्हणाले की, "आपले भविष्य भूतकाळापेक्षाही उज्वल असेल. रिलायन्सला पहिल्या पाचशे कंपन्यांमध्ये येण्यास दशकभराहून अधिक वेळ लागला. त्यानंतर दोनच दशकात कंपनी पहिल्या ५० कंपन्यांच्या सूचीत सामाविष्ट झाला. यामुळे भविष्यात ही कंपनी जगातील टॉप-३० कंपन्यांमध्ये सामाविष्ट होईल, अशी ग्वाही मी आज देतो."