"कंगनाको रेप का तजुर्बा हैं!", खलिस्तानी समर्थक माजी खासदार बरळला

    29-Aug-2024
Total Views |

Kangana Ranaut Controvrsey
 
नवी दिल्ली : पंजाबचे माजी खासदार आणि खलिस्तानी समर्थक सिमरनजीत सिंग मान यांनी भाजप खासदार कंगना राणौतबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कंगनाला बलात्काराचा अनुभव असल्याचे ते म्हणाले असून याप्रकरणी वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
प्रसारमाध्यामाने दिलेल्या माहितीनुसार, कंगना राणौतने याआधी वक्तव्य केले होता. त्यानंतर कंगणा राणौतवर टीका करताना संबंधित खलिस्तांनी नेत्याने आपली पातळी सोडून कंगनावर टीका केली. सिमनरनजीत सिंह म्हणाले की, कंगनाला विचारा की बलात्कार कसा होता. त्याची माहिती कंगनाला आहे तुम्ही त्याबद्दल कंगनाला विचारू शकता.
 
 
 
जशी आपण सायकल चालवतो तसा आपल्याला सायकल चालवण्याचा अनुभव येतो. तसाच बलात्काराचा कंगनाला अनुभव आहे, असे म्हणत मान यांची कंगना राणौतवर टीका करताना जीभ घसरली आहे. यावेळी मान यांना माध्यमांनी आपण कंगना राणौतबद्दल बोलत आहात का? असा सवाल केला असता ते म्हणाले की, हो अर्थातच कंगना राणौतबाबत बोलत आहे, असे म्हणत मान यांनी उत्तर दिले आहे.
 
सिमरनजीत सिंह मान यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत. ते खलिस्तानचे समर्थक आहेत. ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि शीख विरोधी दंगलीच्या निषेधार्थ त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडली होती. त्यांनी भगलापूर येथे ५ वर्षे तुरूंगवास भोगला आहे. त्यानंतर १९८९ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. अशातच कंगनाविरोधात केलेल्या वक्तव्यावरून मान पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत.