शाळेत जाणाऱ्या २ अल्पवयीन मुलींवर कट्टरपंथी शादाब आणि अनसने केले लैंगिक अत्याचार

    29-Aug-2024
Total Views |

Girls Harassment
 
लखनऊ : दोन अल्पवयीन हिंदू मुलींवर कट्टरपंथी युवकांनी बलात्कार केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात घडली. अनस आणि शादाबने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुली शाळेत जात असताना कट्टरपंथी शादाब आणि अनस यांनी पीडितेचे अपहरण करत अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना आपल्या ताब्यात घेतले असून ही घटना २४ ऑगस्ट रोजी घडली आहे.
 
गोंडा जिल्ह्यातील खोद्रे पोलीस ठाणे परिसरात २४ ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत पीडितेने म्हटले आहे की, त्यांची १३ वर्षांची मुलगी सकाळी तिच्या मैत्रिणीसोबत शाळेत गेली होती. यावेळी पीडितेचा १६ वर्षीय अल्पवयीन मित्रही त्याठिकाणी होता. यादरम्यान अनस आणि शादाब नावाच्या कट्टरपंथी युवकांनी मुलींचे आणि त्याच्यासोबत असणाऱ्या मुलाचे वाटेतच अपहारण केले. अनस आणि शादाबसोबत याप्रकरणात आणखी २ अज्ञातांचा सहभाग असून अपहरणासाठी दुचाकीचा वापर करण्यात आल्याचे तक्रारीत सांगितले गेले.
 
 
 
हे प्रकरण पीडितेच्या कुटुंबाला समजताच त्यांनी आपल्या मुलींचा शोध सुरू केला. याप्रकरणात तपास सुरू असताना दोन्ही आरोपी आसपासच्या जंगल असलेल्या ठिकाणी दिसले. त्यांच्यासोबत दोन्ही पीडित मुलीही होत्या. आपल्या कुटुंबियांना पाहिल्यानंतर पीडित मुलींना रडू कोसळले. यावेळी पीडितांच्या कुटुंबियांनी दोन्ही आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पीडित कुटुंबियांच्या हाताला तूरी देऊन पळून गेले. यावेळी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी तक्रारीत केली.
 
पोलिसांनी संबंधित तक्रारीत अनस आणि शादाबचे नाव नमूद करत एफआरआय दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांविरूद्ध भारतीय न्यायसंहित कलम १३७ (२), ८७ आणि ७० (२) शिवाय पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.