विद्युत खांबांवरील हिंदू धार्मिक चिन्हे काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    29-Aug-2024
Total Views |
 
Hindu religious symbols Public Lamp
 
बंगळुरू : भगवान हनुमंतांचे जन्स्थान मानल्या जाणाऱ्या कर्नाटकातील गंगावठी तालुक्यातील रस्त्यांवरील विद्युत दिव्यांना करण्यात आलेले सुशोभीकरण हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शहरातील रस्त्यांवरील विद्युत दिव्यांनी भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्या शस्त्रांस्त्रांचे प्रतीक म्हणून गदा आणि धनुष्य हे सुशोभिकरण म्हणून चित्रित केले होते. मात्र आता
दरम्यान स्थानिक प्रसारमाध्यमानुसार, सार्वजनिक दिव्यांवर हनुमंताची गदा आणि प्रभु श्रीरामाचे धनुष्य अशा चिन्हांनी पथदिव्यांचे सुशोभिकरण केले, मात्र याप्रकरणी कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास महामंडळ विरूद्ध पोलीस खटल्याचीही मागणी करण्यात आली.
 
सोशल डेमोडेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ही बंदी घातलेली इस्लामी दहशतवादी संघटनेची राजकीय शाखा आहे. त्यांनी दिव्यांचे केलेले सुशोभिकरणाने त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे विद्युत पोल गंगावती भागातील राणा सर्कल आणि ज्युलियानगर येथे सुशोभिकरणासाठी बसवण्यात आले होते. या खांबांमुळे शहरातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत अधिसूचनेत म्हटले. शहरातील सार्वजनिक गुन्हा दाखल करून याप्रकरणी कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
कोप्पल जिल्ह्यातील गंगावती येथील अंजनादी पर्वत हे भगवान हनुमंताचे जन्मस्थान आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपचे जनार्दन रेड्डींनी उत्तर प्रदेशातील प्रभु श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या आयोध्या येथे परिसराच्या विकासासाठी राज्याच्या निधीतून १२० कोटी रूपये देण्याची मागणी त्यांनी केली.
 
 
 
अंजनाद्रच्या टेकडीवर लावलेल्या पथदिव्यांवर हनुमंतांची गदा आणि धनुष्यबाण यांचे प्रतीकात्मक असलेले विद्युत खांब बसविण्याचे कारण म्हणजे यामुळे धार्मिक प्रेरणा निर्माण व्हावी. मात्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी जातीय तेढ निर्माण झाल्याचे कारण सांगून खांब काढायला सांगितले. याप्रकरणाला आता वेगळे वळण प्राप्त होण्याची चिन्हे नाकारता येणार नाहीत.
 
विद्युत पोलवर केलेल्या सुशोभिकरणाने कट्टरपंथी दहशतवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफच्या इंडियाची राजकीय शाखा आहे. याप्रकरणी आक्षेप घेतल्याने त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सांगितले गेले. दहशतवादी संघटनेने सांगितले की खांब्यावरील हिंदू धार्मिक चिन्हांमुळे समाजात तेढ निर्माण होईल आणि सलोखा बिघडू शकतो, असे अधिसूचनेत २१ ऑगस्ट रोजी म्हटले आहे.
 
टेकड्यांवर जात असताना गंगावतीच्या रस्त्यांवर खांब लावण्यात आले आहेत. हा मार्ग १२ किमीचा असून भाविकांमध्ये चैतन्य राहावे यासाठी या चिन्हांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये कोणता सांप्रदायी विसंवाद दिसून येतो? असा सवाल हिंदू संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अभियंत्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.