सिंधुदुर्ग : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर दोन गटांत झालेल्या राड्यानंतर ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे आणि नारायण राणेंच्या समर्थकांमध्ये गुरुवारी राजकोट किल्ल्यावर तुफान राडा झाला होता. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.
गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी राजकोट किल्ल्यावर दाखल झाले होते. त्याचवेळी खासदार नारायण राणे आणि निलेश राणेदेखील आपल्या कार्यकर्त्यांसह किल्ल्यावर गेले.
हे वाचलंत का? - शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार आणि कंत्राटदार फरार!
यावेळी आदित्य ठाकरे आणि राणेंचे समर्थक आमनेसामने आले आणि दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे दोन गटात तुफान राडा झाला. या घटनेनंतर बराच वेळ संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. यात एक पोलिस कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी जखमी झालेत. त्यानंतर आता या राड्यातील ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.