पुणे अपघातातील पोर्शे कार परत करा! आरोपी अग्रवाल कुटुंबाची मागणी

29 Aug 2024 18:07:37
 
Pune car
 
पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट पुढे आली आहे. मद्यप्राशन करून दोन जणांना चिरडणारी पोर्शे कार परत करा, अशी मागणी आरोपी अग्रवाल कुटुंबाने केली आहे. याबाबत बालहक्क न्यायमंडळ काय निर्णय घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
पुण्यातील कल्याणीनगर भागात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन आरोपीने भरधाव वेगात कार चालवत दोन जणांचा बळी घेतला. याप्रकरणी त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. तो सध्या जामीनावर बाहेर आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वेदांतच्या कुटुंबियांनी पैशाच्या जोरावर अनेक प्रयत्न केले. परंतू, त्यांचे हे सगळे प्रयत्न फोल ठरले.
 
हे वाचलंत का? -  फाटाफूटीच्या भितीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार चिडीचूप!
 
सध्या वेदांतची त्याची आई शिवानी अग्रवाल, वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल हे तुरुंगात आहेत. तसेच याप्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आता अग्रवाल कुटुंबियाने बाल हक्क न्याय मंडळाला एक अर्ज केला असून आरोपी वेदांतचा पासपोर्ट आणि दोन जणांचा बळी घेणारी पोर्शे कार परत करण्याची मागणी केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0