पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा!

    29-Aug-2024
Total Views |
 
Pooja Khedkar
 
नवी दिल्ली : वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने पून्हा एकदा दिलासा दिला आहे. पूजा खेडकरला ५ सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. गुरुवार, २९ ऑगस्ट रोजी याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
 
बुधवारी पूजा खेडकरने यूपीएससीने केलेले आरोप पूजा खेडकरने फेटाळत यूपीएससीला आपली उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. तसेच एकदा प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून निवड केल्यानंतर उमेदवाराला अपात्र ठरवण्याचा यूपीएससीला अधिकार नाही. केंद्र सरकाराचा कार्मिक आणि प्रशिक्षण विभागच आपल्यावर कारवाई करू शकतो, असे तिने न्यायालयात म्हटले आहे.
 
हे वाचलंत का? -  इस्लामपूर नव्हे ईश्वरपूर म्हणा! नितेश राणेंचं जनतेला आवाहन
 
शिवाय मी यूपीएससीला कोणतीही खोटी माहिती दिली नसल्याचेही तिने म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी पूजा खेडकरच्या अटकेसंदर्भात सुनावणी पार पडली. दरम्यान, उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला ५ सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे तिला ५ तारखेपर्यंत अटक होणार नाही.