मिटकरीचा धर्म तपासण्याची वेळ आलीये : नितेश राणे

    29-Aug-2024
Total Views |
 
Mitkari & Rane
 
सांगली : अमोल मिटकरींचा धर्म तपासण्याची आता वेळ आली आहे, अशी टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. जयदीप आपटेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या भुवईच्या वर एक खून दाखवली असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला होता. यावर राणेंनी प्रत्युत्तर दिले.
 
नितेश राणे म्हणाले की, "आता अमोल मिटकरींचा धर्म तपासण्याची वेळ आली आहे. त्यांचं धर्मांतर तर झालं नाहीये ना, हे तपासण्याची वेळ आली आहे. एकदाच तपास करून गोल टोपी घालून त्याला आम्ही मोकळं करतो. तो आता हिंदू धर्मात राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा!
 
अमोल मिटकरी काय म्हणाले?
 
"जयदीप आपटेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर डाव्या भुवईच्या वर एक खून दाखवली. प्रतापगडाच्या वर झालेल्या रणसंग्रामात ही खोप कुणाकडून आली याचं उत्तर देत असताना तो म्हणतो की, अफजल खानाने महाराजांवर हल्ला केला. अशा प्रकारचा पुतळा बनवून आपटेला काय सांगायचं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची किती प्रतारणा करणार आहात?" असा सवाल मिटकरींनी केला होता.