मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Karnataka Public Lamp) कर्नाटक येथील भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या गंगावठी तालुक्यातील अंजनाद्री टेकडीवर काही विद्युत खांब उभारण्यात आले होते. त्यावर असलेल्या गदा आणि धनुष्यबाण चिन्हावर आक्षेप घेण्यात आला आहे. कोप्पल येथील जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (२८ ऑगस्ट) हे विद्युत दिवे हटविण्याचे आदेश दिले आहेत.
हे वाचलंत का? : शिवरायांचा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्यासाठी संयुक्त समिती नेमणार! मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश
स्थानिक वृत्तांनुसार या सार्वजनिक दिव्यांवर 'हिंदू धार्मिक चिन्हे' चित्रित केल्याप्रकरणी कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास महामंडळ विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय), जी बंदी घातलेली इस्लामी दहशतवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ची राजकीय शाखा आहे. त्यांनी दिव्यांबद्दल आक्षेप घेतला असून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने ही कारवाई केली जात आहे.
हे खांब गंगावती भागातील राणा प्रताप सर्कल आणि ज्युलिया नगर येथे सुशोभीकरणासाठी बसवले आहेत. या खांबांमुळे शहरातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सार्वजनिक शांतता भंग होण्याच्या शक्यतेवरून खांब तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अभियंत्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याबाबतही सांगितले आहे.