केंद्रीय मंत्रालयाकडून नव्या स्टार्टअप्सना मंजूरी; नव्या अभ्यासक्रमांसाठी कोटींचे अनुदान!

    28-Aug-2024
Total Views |
union ministry of textile startsups approval

 
नवी दिल्ली :        केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नव्या चार स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे. तंत्र वस्त्रोद्योगातील महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्‍ये नवोदितांसाठी संशोधन आणि उद्योजकतेसाठी अनुदान (ग्रेट) योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रूपये अनुदानासह मान्यता देण्‍यात आली आहे.


दरम्यान, येथील उद्योग भवनात ८व्या अधिकारप्राप्त कार्यक्रम समितीची(ईपीसी) बैठकीत नव्या स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे. तंत्र वस्त्रोद्योगातील शैक्षणिक संस्थांना सक्षम करण्यासाठी सामान्य मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत तांत्रिक वस्त्रोद्योगातील अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून अनुदानही मंजूर करण्यात आले आहे.

तसेच, नव्या अभ्यासक्रमासाठी २० कोटी रुपयांचे अनुदानही मंजूर करण्यात आले असून मंजूर झालेल्या स्टार्ट-अप प्रकल्पामध्‍ये ‘कंपोझिट’, ‘सस्टेनेबल टेक्सटाइल’ आणि ‘स्मार्ट टेक्सटाइल’ या प्रमुख धोरणात्मक क्षेत्रांवर केंद्रित केले जाणार आहे. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांनी विविध क्षेत्रात नवीन बी.टेक अभ्यासक्रम आणि जिओटेक्‍स्टाइल, जिओसिंथेटिक्स, कॉम्‍पोझिटस, बांधकाम संरचना, इत्यादींसह तांत्रिक वस्त्रोद्योगांचा प्रस्ताव दिला आहे.