श्री भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन

28 Aug 2024 20:41:57
shree bhagwan mahavir life programme


मुंबई : 
     श्री भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण वर्षानिमित्त मांगल्य उजावणी साजरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. सर्व शाळांमध्ये पाचवी ते दहावी या वर्गाकरिता श्री भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित १५ ते २० सप्टेंबर २०२४ या कालावधीकरिता निंबध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, या स्पर्धेसाठीचे निकष व माहिती लवकरच घोषणा करण्यात येईल, असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्रालयात श्री भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्माण वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. यावेळी बैठकीला श्री भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्माण वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य ललीत गांधी, पवन संघवी, संदीप भंडारी, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, उपसंचालक शिक्षण कार्यालयाच्या शिक्षण निरीक्षक भक्ती गोरे यावेळी उपस्थित होत्या.

मंत्री लोढा म्हणाले की, विविध प्रदर्शने, जिल्हास्तरावर व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्ररथ, माहितीपटाचे आयोजन करावे, या कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीचे गठन करण्यात आले असून, जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेपर्यंत खाजगी, सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित अशा सर्व शाळांना या स्पर्धेबाबत माहिती होईल यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. कार्यक्रमांबाबत विविध माहिती सादर करण्याची कार्यवाही काटेकोरपणे करण्याचे निर्देश मंत्री लोढा यांनी समितीला दिले.


Powered By Sangraha 9.0