मोठी बातमी! म्हाडाच्या सदनिका विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात; अर्ज स्वीकृतीस मुदतवाढ

    28-Aug-2024
Total Views |
mhada homes sell rates decreased


मुंबई :
    म्हाडाच्या मुंबई मंडळ सोडतीतील ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाकडून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीसाठी १९ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडा मुख्यालयातील भारतरत्न गुलझारीलाल नंदा सभागृहात 'म्हाडा शुभंकर चिन्हाचा' अनावरण सोहळा संपन्न झाला.. म्हाडाने आधुनिक काळाची आव्हाने पेलत वेळोवेळी आपल्या कार्यप्रणालीला अद्ययावत केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद सुलभ व पारदर्शक राहावा या उद्देशाने म्हाडातर्फे शुभंकर चिन्ह (Mascot) तयार करण्यात आले आहे. या चिन्हाचे अनावरण आपल्या हस्ते करण्यात आले आहे..
 
तसेच, म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकृती प्रक्रियेला दि.१९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २५ टक्क्यांनी, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २० टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १५ टक्क्यांनी, उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात येत आहे. म्हाडाने बदलत्या काळाशी जुळवून घेत आपल्या कार्यात नेहमीच बदल केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत लोकाभिमुख सेवा ऑनलाइन करत नागरिकांच्या अनेक अडचणी सोडविल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एक पाऊल पुढे टाकत म्हाडाचे नवे शुभंकर चिन्ह (मॅस्कॉट) निर्माण करण्यात आले आहे. म्हाडाच्या कार्यप्रणालीची ओळख व मार्गदर्शन मिळविण्याकरिता नागरिकांना याची मदत होणार आहे. लोकांशी अधिक जवळीक साधण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरेल असा विश्वास म्हाडाने व्यक्त केला आहे.