नवी दिल्ली : देशातील कोळसा उत्पादनात गेल्या वर्षापेक्षा अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशात ७.१२ टक्क्यांच्या वाढीसह ३७० दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले आहे. दरम्यान, केंद्रीय कोळसा मंत्रालयाने आतापर्यंत एकंदर कोळसा उत्पादनात मोठी झेप घेतली आहे.
दरम्यान, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशातील समग्र कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन ३७०.६७ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये याच कालावधीत झालेल्या ३४६.०२ दशलक्ष टन कोळसा उत्पादनाच्या तुलनेत यंदा ७.१२ टक्के वाढ झालेली दिसून आली आहे.
उर्जा क्षेत्राला देण्यात आलेल्या कोळशाचा विचार करता, गेल्या वर्षी उर्जा क्षेत्रासाठी देण्यात आलेल्या ३१३.४४ दशलक्ष टन कोळशाच्या तुलनेत सद्यस्थितीस ३२५.९७ दशलक्ष टन कोळशाचे वितरण झाले होते. टीपीपी येथे खुल्या झालेल्या ४७ दशलक्ष टनाच्या प्रचंड सुरवातीच्या साठवणीनंतर देखील वाढ झाली आहे. यातून, उर्जा क्षेत्राला होणाऱ्या अखंडित कोळसा पुरवठ्याची सुनिश्चिती होत आहे.