हिंदुस्तान युनिलिव्हरला करवसुलीची नोटीस; कंपनी आयकरविरोधात अपील दाखल करणार
28-Aug-2024
Total Views |
मुंबई : हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड(एचयुएल)ला प्राप्तिकर विभागाकडून कोट्यवधी रुपयांची नोटीस पाठविण्यात आली आहे. एचयुएल कंपनीला प्राप्तिकर विभागाकडून ९६२.७५ कोटी रुपयांची नोटीस प्राप्त झाली असून याविरोधात अपील करणार असल्याचे कंपनीने सांगितले.
दरम्यान, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंझ्युमर हेल्थकेअरने हॉर्लिक्स, बूस्ट, माल्टोवा आणि व्हिवा सारख्या ब्रँडसह हेल्थ फूड्स ड्रिंक्स व्यवसायाचे बौद्धिक संपदा अधिकार संपादन करण्यासाठी ३,०४५ कोटी रुपये भरल्यानंतर ही नोटीस आली आहे, असे एचयुएलने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, "GlaxoSmithKline 'जीएसके' समूह संस्थांकडून देय देण्यासाठी ३,०४५ कोटी रुपये पाठवताना प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या तरतुदींनुसार टीडीएसची कपात न केल्यामुळे कंपनीकडून व्याजासह ९६२.७५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आदेशाच्या विरोधात अपील केली असून भारतीय कायद्यानुसार आवश्यक प्रक्रिया करेल. करवसुलीची नोटीस दि. २३ ऑगस्ट २०२४ मुंबई इंटरनॅशनल कर सर्किल-२ आयकर उपायुक्त द्वारा जारी केले गेले आहे.