मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (bhoolaxmi temple goddess news) काही अज्ञात हल्लेखोरांनी भूलक्ष्मी मंदिरातील देवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याची घटना सोमवारी रात्री भाग्यनगरच्या राक्षसपुरम परिसरात घडली. संतोष नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण असून याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी मंदिरात मोठा जमाव जमला आणि हल्ल्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
हे वाचलंत का? : कट्टरपंथी आरिफ लंगडाचे तरूणीवर अत्यचार, निषेधकर्त्यांनी घरावर केली दगडफेक
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना सोमवारी रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान घडली. सीसीटीव्हीद्वारे तपास केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. त्यापैकी एक व्यक्ती मुख्य जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या हल्ल्यामागे राजकीय हेतू असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
भूलक्ष्मी देवीच्या मूर्तीची झालेली तोडफोड स्थानिक नगरसेवक आणि त्याच्या लोकांनी केलेले हे कृत्य आहे. हे पहिल्यांदाच झालेले नाही. गेल्या ५ वर्षांपासून हे घडत आहे. या मंदिरावर ५ वेळा हल्ले झाले आहेत. यावेळी देवीच्या मूर्तीची मोडतोड करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी असाच प्रकार विनायक मंडपात घडला होता. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. असा आरोप भाजपचे भाग्यनगर जिल्हाध्यक्ष समरेड्डी सुरेंदर रेड्डी यांनी केला आहे.