राजकोट किल्ल्यावरील राड्यादरम्यान उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना फोन!

    28-Aug-2024
Total Views |
 
Rajkot
 
सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी गेले असता महाविकास आघाडी आणि नारायण राणेंच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यादरम्यान, उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली.
 
गेल्या वर्षी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना सोमवारी घडली. यावरून राज्यातील वातावरण सध्या चांगलंच तापलं असून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. अशातच बुधवारी महाविकास आघाडीने या घटनेच्या निषेधार्थ राजकोट किल्ल्यावर आंदोलन केलं.
 
हे वाचलंत का? -  आदित्य ठाकरेंची किल्ल्यातून सुटका कशी झाली? संपूर्ण घटनाक्रम...
 
याचवेळी खासदार नारायण राणे आणि निलेश राणेदेखील किल्ल्यावर दाखल झाले होते. दरम्यान, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. राणेंच्या समर्थकांनी किल्ल्याचा मुख्य दरवाजा अडवल्याने महाविकास आघाडीचे नेते दोन तास अडकून पडले. या राड्यादरम्यान, उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना फोन करून घटनेची माहिती दिली. तसेच त्यांनी आदित्य ठाकरेंना हिंमत दिल्याचेही सांगण्यात येत आहे.