मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rail Jihad) अलीकडच्या काळात रेल्वे रुळांवर दगड ठेवणे, सिलेंडर किंवा सिमेंटचे ब्लॉक ठेवणे अशा अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याने रेल्वेगाड्या रुळावरून उतरवण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानात बसलेल्या दहशतवादी फरहातुल्ला घोरीच्या एका व्हिडिओमुळे हा संशय अधिकच गडद झाला आहे. यामध्ये त्यांनी भारतीय रेल्वे, पोलीस आणि हिंदू नेत्यांना लक्ष्य करून 'फिदाईन युद्ध' छेडण्यास प्रवृत्त केले आहे. इस्लामिक कट्टरपंथींचा 'रेल जिहाद'चा हा नवा पॅटर्न झाला आहे का? असा प्रश्न आता उद्भवतो आहे.
हे वाचलंत का? : ‘राईट टू डिस्कनेक्ट’च्या निमित्ताने...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी फरहातुल्ला घोरी याने एका स्लीपर सेलला हे काम करण्यास सांगितले आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) दहशतवादाचे कंबरडे मोडत असल्याचे दहशतवादी घोरीने म्हटले आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी देशभरातील पायाभूत सुविधांवर लक्ष्य केले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सुरक्षा यंत्रणांना मिळाला आहे. या व्हिडिओत घोरी ट्रेनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्फोट कसे घडवून आणले जाऊ शकतात, हे सांगत आहे. यासाठी तो प्रेशर कुकरसारख्या वस्तूंपासून बॉम्ब बनवण्याची कल्पनाही देत आहे.
घोरीचे म्हणणे आहे की भारतातील एनआयए आणि ईडी त्यांच्या मदतनीसांची मालमत्ता जप्त करत आहेत. याचे उत्तर भारतात दिले जाईल. ज्याला त्यांनी फिदाईन युद्ध असे नाव दिले आहे. गाड्यांना लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भारतीय एजन्सी कारवाईत आल्या असून सतर्क झाल्या आहेत. अलीकडच्या काळात रेल्वे अपघातांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत असून, अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर अडथळे आणून अपघात घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवड्यात राजस्थानमधून अशीच एक घटना समोर आली होती. जोधपूरहून अहमदाबादला जाणारी वंदे भारत ट्रेन येण्यापूर्वी २२ ऑगस्टला राजस्थानच्या पालीमध्ये सिमेंटचा मोठा ब्लॉक ठेवण्यात आला होता. यानंतर लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावल्याने अपघात टळला.
यासोबतच घोरीने व्हिडिओद्वारे हिंदू नेते आणि पोलिसांची हत्या करण्यास सांगितले आहे. फरहातुल्ला घोरी, ज्याने भारतात रेल्वे अपघात घडवून आणल्याची घोषणा केली आहे, तो नुकत्याच झालेल्या बेंगळुरू रामेश्वरम कॅफे स्फोटाचा मास्टरमाईंड आहे. याशिवाय गुजरातमधील अक्षरधाम मंदिर हल्ल्यातही त्याचा हात होता. भारतातून मुस्लिम तरुणांची भरती करून त्यांचे दहशतवादी बनवणे हे त्याचे मुख्य काम होते. तो अनेक दहशतवादी मॉड्यूलचा हँडलर आहे.