पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट! यूपीएससीने केलेले आरोप फेटाळले

    28-Aug-2024
Total Views |
 
Pooja Khedkar
 
नवी दिल्ली : पूजा खेडकर प्रकरणी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. यूपीएससीने केलेले आरोप पूजा खेडकरने फेटाळले आहेत. तसेच यूपीएससीला आपली उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार नसल्याचेही तिने म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरु आहे.
 
खोटं अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेटही सादर करून परिक्षा पास झाल्याचा पूजा खेडकरवर आरोप आहे. याप्रकरणी यूपीएससीने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. तसेच भविष्यात तिला यांना कुठलीही युपीएससीची परीक्षा देता येणार नसल्याचेही म्हटले होते.
 
हे वाचलंत का? -  राजकोट किल्ल्यावरील राड्यादरम्यान उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना फोन!
 
परंतू, आता पूजा खेडकरने यूपीएससीवरच आरोप केले आहेत. आपली उमेदवारी रद्द करण्याचा यूपीएससीला अधिकार नसल्याचे तिने म्हटले आहे. तसेच एकदा प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून निवड केल्यानंतर उमेदवाराला अपात्र ठरवण्याचा यूपीएससीला अधिकार नाही. केंद्र सरकाराचा कार्मिक आणि प्रशिक्षण विभागच आपल्यावर कारवाई करू शकतो, असे तिने न्यायालयात म्हटले आहे. तसेच मी यूपीएससीला कोणतीही खोटी माहिती दिली नसल्याचेही तिचे म्हणणे आहे.