धक्कादायक! कंत्राटी कर्माचाऱ्यांनी चहा-नाश्ता खाऊ घालत अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार
28-Aug-2024
Total Views |
जोधपूर : कंत्राटी कामगारांनी अल्पवयीन मुलीला चहा-नाश्ता खाऊ घालत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी जोधपूर जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात घडली आहे. रागाच्याभरात घराबाहेर गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर दोन तरूणांनी अत्याचार केला. राजस्थानातील याप्रकरणातील दोन्ही आरोपी हे रूग्णालयातील कंत्राटी कामगार असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रसारमाध्यमानुसार, हे प्रकरण जोधपूर येथील महात्मा गांधी रूग्णालयातील आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास जोधपूरच्या सुरसागर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन १४ वर्षीय मुलीला तिच्या आईने काही कारणास्तव तिला सुनावले. याचा राग मनात धरून मुलगी घरातून निघून गेली. त्यावेळी ती फिरत असताना तिने महात्मा गांधी रूग्णालय गाठले. येथे पीडितेला रूग्णालयातील दोन कंत्राटी कामगार भेटले. त्यांनी मुलीला आपल्या विश्वासात घेत तिच्याशी गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर तिला रूग्णालयाच्या मागे घेऊन गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतले असून पीडितेला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावेळी पीडितेने आपल्या कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर संबंधीत प्रकरणातील आरोपींची ओळख पटू लागली आहे.
याप्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. त्यामध्ये रूग्णालयातील दोन कंत्राटी कामगार आणि अल्पवयीन मुलगी चहा नाश्ता करताना दिसत आहे. अखेर दोन्ही आरोपींची ओळख पटली आणि दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.