धक्कादायक! हिंदू मित्राच्या तीन वर्षीय मुलीवर कट्टरपंथी युवकाकडून लैंगिक शोषण

    28-Aug-2024
Total Views |

Gujrat
 
गांधीनगर : हिंदू मित्राच्या ३ वर्षीय मुलीवर कट्टरपंथी युवकाने लैंगिक शोषण (Sexual Assault) केले असल्याची घटना गुजरात येथील वलसाडमधील उमरगाम परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचे नाव गुलाम मुस्तफा असून लैंगिक अत्याचाराप्रकरणी  पोक्सो कायद्यांतर्गत २७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अल्पवयीन मुलींची प्रकृती चिंताजनक असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला पालघर येथे पकडण्यात आले तो आपल्या गावी झारखंड येथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. 
 
पोलिस अधीक्षक करणराज वाघेला म्हणाले, मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोक्सो आणि भारतीय कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. तसेच या तपासात आरोपी हा पीडितेच्या चाळीत राहत होता अशी माहिती सांगण्यात आली आहे. या घटनेपूर्वी आरोपीने पीडितेच्या वडिलांना दारू पाजली होती, असे तपासानंतर सांगण्यात आले होते.
 
 
 
 
पीडित मुलगी नेहमी चाळीच्या आवारात खेेळत असायची, मात्र पीडितेच्या आईला ती कुठेच दिसली नाही. त्यावेळी पीडितेच्या आईने आपल्या लहान मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपल्या कोवळ्या जीवावर बाथरूममध्ये लैंगिक अत्याचार होताना पाहिले असता आईने आरडाओरड केली. त्याच क्षणी आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्याचवेळी अल्पवयीन पीडितेला उपचारासाठी स्थानिक रूग्णालयात हलवण्यात आले.
 
या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनी २७ ऑगस्ट रोजी उमरगाम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी गुलाम मुस्तफा याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे वलसाड परिसरात प्रचंड संताप आणि निषेध व्यक्त केला गेला. हिंदू संघटनांसह, मोठ्या संख्येने लोक उमरगाम पोलीस ठाण्याभोवती जमले आणि या प्रकरणात त्वरीत कारवाई करावी आणि आरोपींना त्वरित अटक करावी या मागणीसाठी पेटून उठले होते. त्यांचा आक्रोश थांबवण्यासाठी पोलिसांना अनेक पथके तैनात करावी लागली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी पीडितेची वलसाड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केली. शिवाय, त्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. याप्रकरणात उमरगाम परिसरात बंद पुकारण्यात आला आहे.