हिंदू युवकाचे हात बांधून केली मारहाण, पीडित युवक ओरडत राहिला, कट्टरपंथी तरूणाचे हैवानी कृत्य

    28-Aug-2024
Total Views |

Bihar
 
पाटना : हिंदू युवकाचे हात बांधून कट्टरपंथी तरूणाने मारहाण केली. यावेळी पीडित युवक ओरडत राहिला, दयेची याचना करू लागला मात्र याचा कट्टरपंथी युवकाला फारसा फरक पडला नाही. नंतर पीडिताच्या गुप्तांगाला लाल मिर्ची पावडरची पुड टाकल्याचे हैवानी कृत्य एका व्हिडिओतून व्हायरल झाले आहे. हा व्हिडिओ बिहार येथील अररिया जिल्ह्यातील असून ही घटना २६ ऑगस्ट रोजी घडली आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या इतर लोकांची ओळख पटवून अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
हे कृत्य कट्टरपंथी युवक मोहम्मद सिफत नावाच्या युवकाने केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बिहार येथील अररिया जिल्ह्यातील इस्लामनगर पोलीस ठाणे हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणात काहींनी हिंदू युवकाला चोर असल्याच्या संशयावरून पकडले गेले. त्याला आधी मारहाण केली आणि नंतर त्याचे हातपाय बांधले गेले. यावेळी त्यांनी पीडित तरूणाच्या गुप्तांगात मिर्चीची पुड टाकली. यावेळी पीडित तरूण ओरडू लागला दयेची याचना करू लागला. मात्र संबंधित युवकांना त्याचा काहीच फरक पडला नाही. गुप्तांगात मिरची भरल्यानंतर त्याला पँट घालायला सांगितली गेली.
 
 
 
याप्रकरणात कट्टरपंथी युवक मोहम्मद सिफतला बिहार पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचा दावा हरि मांझा यांनी आपल्या (X) ट्विटरवर केला आहे. ते म्हणाले की, आरोपी हा एक कट्टरपंथी आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि आऱजेडी हे पक्ष कट्टरपंथींना खूपदा मदत करते, असा दावा हरि मांझा यांनी ट्विटद्वारे केला.
 
याप्रकरणात पोलिसांनी मोहम्मद सिफतला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी इस्लामनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ आणि ११७ (४) अंतर्गत आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पीडितेवर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर दुचाकी चोरी केल्याचा आरोप असून त्याच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला. यावेळी पीडित तरूणाला अर्धातास पोलीस ठाण्यात ठेवले होते. मात्र लेखी तक्रार नसल्याने त्याला त्वरीत सोडण्यात आले.