पं.बंगाल बंददरम्यान भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार

    28-Aug-2024
Total Views |
 
Firing
 
कोलकाता : आर. जी कर महाविद्यालयातील बलात्कार प्रकरणानने पं.बंगाल येथे बंद (West Bengal Bandh) पाळण्यात आला. या बंदला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. या बंददरम्यान भाजपच्या पश्चिम बंगाल नेत्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आहे. भाटपारा येथील भाजप नेते प्रियंगू पांडे यांच्या चारचाकी वाहनावर सात राऊंड फायरिंग करण्यात आली. यामुळे संतापाचे वातावरण असून ही घटना २७ ऑगस्ट रोजी घडली आहे. या घटनेने पं.बंगालमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
बुधवारी २८ ऑगस्ट रोजी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी पक्षाच्या मुख्य नेत्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. भाजप नेत्यांनी प्रियंगू पांडे यांच्या चारचाकी वाहनावर गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच पं.बंगाल भाजप नेते अर्जुन सिंह यांनी गोळीबाराचा व्हिडिओ आपल्या (X) अकाऊंटवर शेअर केला असून घ़डलेला प्रकार सांगितला आहे.
 
 
 
अर्जुन सिंहांचे ट्विट जसेच्या तसे 
 
अर्जुन सिंह यांनी आपल्या (X) अकाऊंटवर लिहिले की, “आज सकाळी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या पाठिशी असलेल्या गुन्हेगारांनी भाजप नेता प्रियंगू पांडे पक्षाच्या कार्यक्रमासाठी माझ्या कार्यालयात जात असताना एसयुव्ही या चारचाकी वाहानावर गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने प्रियंगू पांडे यांना कोणतीही दुखापत झाली नाही पण कारचालक रवी वर्मा आणि पक्षाचे इतर कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात आला."
 
पुढे ते म्हणाले की, "रवी सिंहची प्रकृती गंभीर आहे. त्याला कोलकाता येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. हा हल्ला गुन्हेगार आणि पोलिसांच्या संगमताने नियोजित पद्धतीने करण्यात आला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना अशा भ्याड हल्ल्यात अडकू नये तसेच राजकीयदृष्ट्या लढा देण्याची सूचना करतो. हल्लेखोर, कटकारस्थान आणि त्यांचे आश्रयदाते यांच्यावर त्वरीत कठोर कारवाई करण्याची माझी मागणी आहे. मी राष्ट्रीय तपास संस्थेला याप्रकरणाची चौकशी करा आणि दोषींना पकडा अशी विनंती करतो," असे सिंह यांनी सोशल मीडियावर लिहिले.