आदित्य ठाकरेंची किल्ल्यातून सुटका कशी झाली? संपूर्ण घटनाक्रम...

    28-Aug-2024
Total Views |
 
Thackeray
 
सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर तब्बल दोन तासांनंतर आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्याबाहेर पडले. सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याने महाविकास आघाडीने निषेध मोर्चा काढला होता.
 
बुधवारी महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी तिथे खासदार नारायण राणे आणि निलेश राणेदेखील पोहोचले. दरम्यान, यावेळी भाजप आणि मविआचे कार्यकर्ते आमनेसामने आले. एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु झाली आणि दोन्ही गटात तुफान राडा झाला.
  
हे वाचलंत का? - "प्रत्येक गोष्टीला निवडणूकीच्या..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका
 
भाजपचे कार्यकर्ते राजकोट किल्ल्याचा मुख्य दरवाजात असल्याने आदित्य ठाकरेंसह मविआचे नेते तब्बल दोन तास किल्ल्यात अडकून पडले. आपण मुख्य दरवाज्यातूनच बाहेर पडणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर हा वाद सोडवण्यासाठी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी निलेश राणेंशी चर्चा केली. तसेच त्यांनी आदित्य ठाकरेंशीही चर्चा केली.
 
या सगळ्यानंतर तब्बल दोन तासांनी आदित्य ठाकरेंची राजकोट किल्ल्यातून सुटका झाली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते किल्ल्याच्या बाहेर पडले. दरम्यान, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.