कट्टरपंथी आरिफ लंगडाचे तरूणीवर अत्यचार, निषेधकर्त्यांनी घरावर केली दगडफेक

    28-Aug-2024
Total Views |

Hindu Women
 
रायपूर : कट्टरपंथी तरूणाने रायपूर येथील एका हिंदू तरूणीवर अत्याचार केला. यावेळी पीडितीने कट्टरपंथी तरूणाच्या कृत्याविरोधात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी घटनास्थळावरील अनेक लोकांनी कट्टरपंथी तरूणाच्या अटकेची मागणी केली आहे. संबंधित घटनास्थळावरील लोकं संतापले आहेत. ही घटना रायपूर येथील सरस्वतीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. याठिकाणी छोट्या मशीद येथे राहणाऱ्या आरिफ लंगडा या तरूणाने २५ ऑगस्ट रोजी एका तरूणीसोबत विनयभंग केला होता. यामुळे घटनास्थळावरी अनेक लोकांनी निषेध व्यक्त करत आरिफला अटक करण्याची मागणी केली होती.
 
पीडितेने त्रासाला कंटाळून घटनास्थळी आरडाआरड केली. याआधी अनेकदा आऱिफने महिला आणि मुलींच्या छेडछाड केल्याच्या घटना आहेत. याप्रकरणी तरूणीच्या कुटुंबियांनी आरिफच्या घरी  तक्रार केली असता पुन्हा आरिफने पीडितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. विनयभंगाला विरोध करणाऱ्यांवर आरिफच्या कुटुंबियांनी मारहाण केली. याप्रकरणातील दुसरी प्रत्युत्तराची बाजू समोर आली.
 
घटनास्थळावरील उपस्थितांनी आरिफच्या घराबाहेर घेराव घातला आणि निदर्षने केली. घटनास्थळी असलेल्यांनी याप्रकरणात लक्ष घालत प्रत्युत्तर दिले आहे. तसेच घटनास्थळी असलेल्यांनी युवतीवर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवून त्यांनी सरस्वतीनगर पोलीस ठाण्यात जाऊन निषेधही केला. यावेळी आरोपी आरिफवर एफआरआय दाखल केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे सांगण्यात आले आहे.