नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत कोलकाता येथील विद्यार्थ्यांनी नबन्ना मार्च (नबन्ना मार्च) काढला आहे. दरम्यान, या नबन्ना मार्च बिल्डिंगकडे वळविला असता पश्चिम बंगाल सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. बंगाल सरकारने नबन्ना मोर्चा मोडून काढण्यासाठी पोलिसांकरवी लाठीचार्ज देखील केला आहे. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील अत्याचार प्रकरणी आंदोलक मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, आंदोलकांना थांबवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने दमनकारी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच, विद्यार्थ्यांचा नबन्ना मोर्चा मोडून काढण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत पाण्याच्या तोफांचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या आहेत. परंतु, आंदोलक आपल्या भूमिकेवरून थांबण्यास तयार नाहीत. आंदोलकांना हावडा ब्रिज ओलांडण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे आरजी कार मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ 'छात्र समाजा'तर्फे हा मोर्चा काढण्यात आला आहे. ‘छत्र समाज’ ही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर उदयास आलेली संघटना असून ममता सरकारने हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तसेच, अशांतता निर्माण करणाऱ्या उपद्रवी घटकांची गुप्तचर माहिती मिळाली आहे, असाही दावा सरकारने केला आहे.
हावडा येथे आंदोलक बॅरिकेड्सवर चढताना लाठीचार्ज
आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बलात्कार-हत्या प्रकरणी न्याय मिळावा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'नबान्ना अभियान' मोर्चा काढत आंदोलन केले. हावडा येथील संत्रागछी येथे पोलिसांच्या बॅरिकेड्सवर चढत पोलिसांशी झटापट केली. यासोबतच आंदोलकांनी सचिवालयाजवळील बॅरिकेड्सही तोडले.
आंदोलकांच्या आक्रमकतेनंतर पोलिसांनी जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सोबतच पोलिसांकडून लोकांवर लाठीचार्जही करण्यात आला. लाठीचार्ज, पाण्याच्या तोफांचा पाऊस आणि अश्रुधुराच्या गोळीबारानंतरही आंदोलक हावडा पुलावरून मागे हटायला तयार नाहीत. पोलिस-प्रशासन आंदोलकांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करत असतानाच आंदोलकांनी हावडा ब्रिजवरच ठिय्या मांडला आहे. अनेक आंदोलकांच्या हाती तिरंगा ध्वज असल्याचे पाहायला मिळाले.