मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. दि. २७ ऑगस्ट रोजी पुण्यात त्यांची प्राणज्योत मालवली. गेली अनेक दशके त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटविला. बुधवारी पुण्यातील वैंकुठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी कलाविश्वातदेखील आपल्या अभिनयाची छाप सिनेरसिकांच्या मनावर उमटविली आहे. गेली अनेक दशकं या हरहुन्नरी अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्या ६५ वर्षांहून अधिक काळ सिनेविश्वात कार्यरत होत्या असून मालिकांमध्येही त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. २०११ साली आलेल्या 'सिंघम' सिनेमामध्येही त्यांनी भूमिका साकारली होती.