मुंबई : गतवर्षी प्रमाणे यंदाही प्रभादेवी येथील दहीहंडी सराव शिबीर रविवारी मोठ्या जल्लोषात पार पडले. जवळपास १२०हून अधिक गोविंदांनी यावेळी आपले कौशल्य दाखवले आहे. शिबीर आयोजक विशाल तोडणकर, चेतन देवळेकर तसेच भाजपचे मुंबई सचिव सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे आयोजनासह नियोजनही सुंदर पार पडले.
महिला गोविंदा पथकांची वाढलेली संख्या हे या प्रभादेवी सराव शिबीराचे वैशिष्ट्य होते. कॅबिनेट मंत्री आमदार मंगप्रभात लोढा तसेच भाजप मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी या सराव शिबिराला विशेष उपस्थिती लावली. नवरा माझा नवसाचा २ या सिनेमातील प्रमुख कलाकार सचिन पिळगांवकर तसेच स्वप्नील जोशी यांनीही काही काळ उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी संध्याकाळी ५ वाजल्यापासूनच गोविंदांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. प्रत्येक वर्षागणिक भाजपाचे प्रभादेवीमधील दहीहंडी सराव शिबीर लोकप्रियतेचे नवे उच्चांक गाठत आहे.